शेवगा
अमूल्य माहिती
शेवगा - 👍
शेवगा आहारात नेहमीच वापरलात तरी काहीच हरकत नाही. कारण यात औषधी गुणधर्म फार आहे. शेवगा गरम, हलका, तिखट, मधुर, अग्नीप्रदीपक, रुचकर, दाहकारक वीर्य वर्धक, पित्त व रक्त प्रकोपक असून शेवग्याची भाजी वात विकार दूर करणारी आहे.
औषधी गुण – शेवग्याच्या मुळांचा रस काढून किंवा त्याच्या काढ्यात मध घालून घेतल्याने गळू बरे होतात. शेवग्याच्या फुलात ‘प्टेरेगोस्परमीन, पाल्मिक एसिड, स्टेइक एसिड, बेटेनिक एसिड, ओलेइक एसिडहे घटक असतात. टेरिगोस्पर्मीन नावाचे प्रती जैविक असतात. पानातील रसात जीवाणू नाशक तत्व असतात. तसेच त्याच्या खोडातून भुरकट डिंक मिळतो. तसच बियां मधून रंग रहित तेल मिळत. शेव्ग्यात मोठ्या प्रमाणात खनिजं आढळतात.
शेवग्यापासून जीवनसत्व ‘अ’ ‘क’आणि ‘इ’ तयार करतात. पाणी शुद्धी करण्यात शेवग्याच्या बियांचा वापर होतो. याच्या पानाचा रस पिल्याने उचकी थांबते
शेवग्यामुळे नैसर्गिक इंसुलिनचे प्रमाण वाढते, जे मधुमेह नियंत्रण ठेवते.
कांजण्यांना प्रतिबंधित करते
खूप काही लोकांना माहित आहे की शेवगा चिकनपॉक्सची लक्षणे देखील दूर करीत आहे. एप्रिल-जूनमध्ये जेव्हा जास्त उष्णता येते तेव्हा चिकनपॉक्सचा उद्रेक वाढतो. शेवग्यात असे गुणधर्म आहेत ज्यामुळे कांजण्यांना प्रतिबंध होतो
हृदय निरोगी ठेवते
जर आपला रक्तदाब नेहमीच वाढत असेल तर आपण शेवगा्याचे सेवन करावे. जर आपण नियमितपणे शेवगा भाजीपाला वापरत असाल तर आपले हृदय नेहमीच निरोगी असेल.
शरद कासार्ले
Comments
Post a Comment